पुणे: खेड पोलिसांकडून दोघेजण हद्दपार

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत व हद्दीबाहेर पुणे जिल्ह्यात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना १ वर्षासाठी खेड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ऋषिकेश मचिंद्र काशीद (वय २४, रा. खरपुडी, ता. खेड) व कुणाल बाबाजी टाकळकर (वय २३. रा. पाबळरोड होलेवाडी, ता. खेड) असे हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खेड परिसरात जमाव जमवून मारामारी, दंगल करणे, बेकायदा जमाव जमवून नागरिकांना जखमी करणे, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे या दोघांवर आहेत. खेड पोलिसांनी या दोघांविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. नुकताच त्यांच्या हद्दपरीचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मंगळवारी(दि. १४) दिली.