जुनी पेन्शन: संपामुळे पुण्यातील शासकीय कार्यालयात शुकशुकाट | पुढारी

जुनी पेन्शन: संपामुळे पुण्यातील शासकीय कार्यालयात शुकशुकाट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासुन पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील शासकीय कार्यालयात शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. विशेषतः कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवुन देणाऱ्या दस्त नोंदणी विभागातील सुमारे 12 ते 15 कार्यालयात संपामुळे पूर्णपणे शुकशुकाट आहे, तर 3 कार्यालयांना सुट्टी असल्याने कामकाज ठप्प झाले आहे.

जलसंपदा, समाज कल्याण, पीडब्ल्यूडी, उत्पादन शुल्क, इतर मागास बहुजन कल्याण, बार्टी, महिलां व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख , महसूल विभाग यासह इतर सर्वच शासकीय कार्यालयामध्ये संपामुळे कामकाज ठप्प आहे.

Back to top button