राहु : आ. राहुल कुल यांच्या गावात खा. संजय राऊत यांचा निषेध | पुढारी

राहु : आ. राहुल कुल यांच्या गावात खा. संजय राऊत यांचा निषेध

राहु(ता.दौड); पुढारी वृत्तसेवा : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये सुमारे 500 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर केल्याने त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या गावात राहूयेथे निषेध सभा घेत राऊत यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला.

या निषेध सभेसाठी राहू बेट परिसरातील राहू, पिलानवाडी, टेळेवाडी, कोरेगाव भिवर, वाळकी, दहीटने, मिरवडी, देवकरवाडी, पाटेठाण, सहजपूर, नांदूर येथील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे भीमा पाटस कारखाना सुरू झाला असून तालुक्यातील काही विरोधकांच्या पोटात गोळा आला असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, सरपंच दिलीप देशमुख, कैलास गाढवे, मारुती मगर, डॉ. विलास भंडारी, अरुण नवले, हनुमंत बोरावणे, युवराज बोराटे, मनीषा नवले, जयश्री जाधव, रोहिदास टिळेकर, रोहिदास कंद,सुधाकर थोरात, पांडुरंग सोनवणे, आनंद कदम, पृथ्वीराज जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button