पिंपरी : उन्हाळ्यातील वाढत्या उकाड्यावर फॅनचा गारवा

पिंपरी : उन्हाळ्यातील वाढत्या उकाड्यावर फॅनचा गारवा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जसजसा उन्हाचा तडाखा वाढत आहे. उकाड्यापासून सुटका होण्यासाठी नागरिक फॅनची तसेच वातानुकुलित यंत्रणेची खरेदी करताना दिसून येत आहेत. घराच्या गरजेनुसार आणि आकारानुसार वापरता येणारे विविध फॅनचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याला नेहमीचे सिलिंग फॅन आणि टेबल फॅन तर परिचयाचे आहेतच. पण जर बाजारातील इलेक्ट्रिक दुकानांमध्ये फेरफटका मारले, तर विविध प्रकारचे नावीन्य फॅनमध्ये पहायला मिळते. यामध्ये छोट्यात छोट्या आकाराचे पोर्टेबल फॅनदेखील आहेत. काही बॅटरी चार्ज करून वीज गेली तरी दोन ते तीन तास चालणारेदेखील फॅन उपलब्ध आहेत. तर काही थंडगार हवेबरोबर लाईट असणारे देखील फॅन आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात जास्त हाल होतात ते गॅससमोर स्वयंपाक करणार्‍या महिलांचे. अशावेळी फॅन लावला तर गॅस विझण्याची भीती. त्यामुळे महिलांना घामाघूम होऊन स्वयंपाक करावा लागतो. महिलांच्या सोयीसाठी नेक बँड फॅन बाजारात उपलब्ध आहेत. हादेखील चार्जिंगवर चालणारा फॅन आहे. या छोट्या फॅनची हवा फक्त चेहर्‍यालाच लागते.

वॉल माउंंटिंग फॅन
काही वेळेला घराचे छत खाली असेल तर सिलिंग फॅन लावता येत नाही. त्यामुळे भिंतीच्या कोपर्‍यात किंवा भिंतीला बसविण्यात येणारे वॉल माउंटींग फॅन बाजारात उपलब्ध आहेत.  पेडेस्टल फॅन व केबिन फॅन जास्त करून मोठ्या हॉलमध्ये किंवा ऑफिसमध्ये हे फॅन वापरले जातात. यामध्ये फायबर आणि मेटल असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत.

हॅण्ड पोर्टेबल फॅन
पूर्वी कागदाचा पंखा हवा घालण्यासाठी वापरला जात होता. मात्र आता याची जागा हॅण्ड पोर्टेबल फॅनने घेतली आहे. हा फॅन आकाराने इतका लहान असतो की, आपण याला बॅगमध्येदेखील घेऊन जाऊ शकतो. हा चार्जिंगवर चालत असल्याने लाईट गेली तर उकाड्याची चिंता नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news