पिंपरी : हुश्श... संपली एकदाची परीक्षा! | पुढारी

पिंपरी : हुश्श... संपली एकदाची परीक्षा!

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : संपली एकदाची परीक्षा, असे म्हणत विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. बारावीची सोमवार (दि. 13) परीक्षा संपली. त्यामुळे शहरातील परीक्षा केंद्रांवरून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण होते.
पेपर सुटल्यांतरही बराच वेळ परीक्षा केंद्रात विद्यार्थी एकमेकांची भेट घेत रेंगाळत होते. विद्यार्थी नेहमीपेक्षा वेगळ्या मूडमध्ये होते. पेपर सुटल्यानंतर सेलिब्रेशन काय करायचे हे अगोदरच ठरविले होते.

शेवटचा पेपर म्हणजे मपार्टी तो बनती हैफ असे म्हणून विद्यार्थ्यांनी आईस्क्रिम, वडापाव, ज्युसच्या दुकानावर गर्दी केली होती. यामध्ये कोणाचे सिनेमा पहायचे तर पुढे काय धमाल करायची, याचे प्लॅनिंग सुरू होते. जेवढे दिवस सुट्या आहेत, यामध्ये काय नियोजन करायचे याची जोरदार चर्चा रंगली होती. आता परीक्षा संपल्यामुळे सध्या तरी परीक्षेचे टेन्शन खल्लास झाले आहे. आता अभ्यास कर म्हणून पालकांचा तगादा लागणार नाही, यामुळे तणावमुक्त दिसत होते.

Back to top button