पुणे : मूग, उडीदडाळ महागली; साखर, खाद्यतेलांचे दर स्थिर | पुढारी

पुणे : मूग, उडीदडाळ महागली; साखर, खाद्यतेलांचे दर स्थिर

पुणे : आवक कमी असल्यामुळे मूगडाळ आणि उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली, तर गावरान मटकी दरात आणखी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे साखर, गूळ, खाद्यतेले, गहू, ज्वारी, बाजरीचे दर स्थिर असल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह बहुतांशी सर्वच खाद्यतेलांचे दर स्थिर होते. मात्र सोयाबीन तेलाच्या दरात 15 किलोमागे पन्नास रुपयांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या उठाव कमी असल्यामुळे खाद्यतेलांचे दर मंदीतच असल्याचे सांगण्यात आले.

उन्हाचा वाढता तडाखा आणि गुडीपाडव्याचा सण लक्षात घेऊन केंद्र सरकारने चालू महिन्यासाठी बावीस लाख टन इतकी मुबलक साखर खुली केली आहे. बाजारात साखरेची आवक मुबलक असली तरी अद्यापही मागणी कमीच आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3475 ते 3500 रुपये होता. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गुळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.

मूगडाळ, उडीदडाळ दरात वाढ
आवक कमी असून मागणी चांगली असल्यामुळे गेल्या आठवड्यात मूगडाळ आणि मटकीडाळीच्या दरात क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली. सेलम मटकीतील घसरणीनंतर गावरान मटकीचे दरही 500 रुपयांनी कमी झाले. मात्र आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते. होळीनिमित्त मध्यप्रदेशातील पेठा चार दिवस बंद होत्या.

यामुळे तेथून होणारी विविध जिनसांची आवक बंद होती. येत्या सोमवारपासून आवक पूर्ववत सुरू होईल, असा अंदाज आहे. नव्या गव्हाची आवक मुबलक प्रमाणात होत असून आता दरातील घसरण थांबली आहे. नव्या गावरान ज्वारीची आवकही नियमितपणे होत आहे. गेल्या आठवड्यात गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3475-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2750-2825, रिफाईंड तेलः 2600-3400, सरकी तेल 1650-2000, सोयाबीन तेल 1725-1880, पामतेल 1500-1750, सूर्यफूल रिफाईंड तेल 1700-1850, वनस्पती तूप 1475-1925, खोबरेल तेल 2250 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3300, एम.पी. लोकवन नं.1 3400-3600, नं.2 3100-3300, सिहोर नं. 1 5000-5200, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी नं.1 3600-3800, नं. 2 3100-3300 मिलबर 2450-2500रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5300-5500, गावरान नं. 2-4700-5000, नं. 3 4300-4500, दूरी 3500-4000 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.

गूळ : गूळ एकस्ट्रा 3700-3950, गूळ नं. 1 3550-3650, गूळ नं. 2 3400-3500, गूळ नं.3 3250-3350, गूळ नं. 4 3100-3200, बॉक्स पॅकिंग 3400-4600 रु. डाळी : तूरडाळ 10500-11700, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7300-7400, मटकीडाळ 9900-10000, उडीदडाळ 9000-10500 रु.

कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा- 7000-7500 चवळी 7500-8500, मसूर 6600-6700, मूग 8800-9000, मटकी गावरान 10500-11500, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000, मटकी राजस्थान 8000, मटकी सेलम 11500-11600, वाटाणा हिरवा 5800-6000, वाटाणा पांढरा 6500-6600, काबुली चणा 12000-15000 रु.

साबुदाणा : साबुदाणा नं.1 6500, साबुदाणा नं.2 6200, साबुदाणा नं. 3 6000 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1200-1400 रु. शेंगदाणा : जाडा 12000-12500, स्पॅनिश – 11600-11800, घुंगरु 11000, टीजे 10700-10800 रु. धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300

रु.पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु.

रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1525-1625, रवा 1525-1625, मैदा 1525-1625, बेसन :- (50 किलोस) 3350-3650 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मिरी ढब्बू 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु. नारळ : (शेकड्याचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रुपये.

 

Back to top button