आंबेगावात गहू उत्पादनात वाढ | पुढारी

आंबेगावात गहू उत्पादनात वाढ

पारगाव(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गहू मळणीची कामे वेगात सुरू आहेत. यंदा अनुकूल हवामानाची साथ मिळाल्याने, तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने गहू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्याच्या पूर्व भागात गेली आठ दिवसांपासून गहू मळणीची कामे सुरू आहेत. मागील आठवड्यात या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

यामुळे काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी गहू मळणीची लगबग सुरू केली आहे. यंदा पाण्याची समस्या अजिबात जाणवली नाही. लांबलेली थंडीदेखील गहू पिकाला पोषक ठरली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यातच गव्हाचे भाव वाढल्याने शेतकर्‍यांना या पिकाच्या माध्यमातून अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button