पुरंदर उपसाचे पाणी पोहोचले बंधार्‍यात

पुरंदर उपसाचे पाणी पोहोचले बंधार्‍यात

दिवे; पुढारी वृत्तसेवा : दिवे येथील शेतकर्‍यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पुरंदर उपसा योजनेचे पाणी दिवे येथीलआबासाहेब झेंडे यांच्या घराजवळील बंधार्‍यात पोहोचले. या वेळी शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. या पाण्याने हा बंधारा पूर्ण भरल्याने शेतीच्या पाण्याची टंचाई सध्यातरी दूर झाली आहे. दिवे येथील दरावस्ती येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. कडक उन्हामुळे चारा पिके कोमेजली होती.

अंजीर, सीताफळ बागांनासुध्दा पाण्याची गरज होती. वन्यप्राण्यांसाठी चारा व पाणीटंचाई निर्माण झाली होती. या ठिकाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची जलवाहिनी आहे, ती चार दिवसांपूर्वी फुटली. शेतकर्‍यांनी जिद्द कायम ठेवत प्रशासनाची वाट न पाहता, स्वखर्चाने वर्गणी गोळा करून ती दुरुस्त केली.

पाणी आणण्यासाठी मुरलीधर झेंडे, सुधीर झेंडे, ताराचंद झेंडे, आबा झेंडे, शिवाजी झेंडे, कान्हू झेंडे, संतोष झेंडे, माजी सरपंच रमेश झेंडे, भरत झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ऋषिकेश झेंडे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. या वेळी सुधीर काळभोर, शुभम झेंडे, ऋषी ढुमे, भरत झेंडे, संदीप महाराज झेंडे उपस्थित होते. माजी उपसरपंच रूपाली झेंडे, किरण झेंडे, शोभा झेंडे, मंदा झेंडे या महिलांनी पाण्याचे पूजन केले.

'पुढारी'चे मानले आभार
दै. 'पुढारी'ने पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची वस्तुस्थिती मांडली, तसेच सतत पाठपुरावा केला, म्हणून शेतकर्‍यांनी दै. 'पुढारी'चे आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news