वडगाव मावळ : विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला

file photo
file photo

वडगाव मावळ; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सोमाटणे टोलनाक्याजवळ औषध वाहतुकीच्या नावाखाली गोवा राज्यनिर्मित विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या कंटेनरवर कारवाई करून कंटेनर व विदेशी दारू असा सुमारे 86 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, कंटेनर चालकास अटक केली आहे.

शंकरलाल नारायण जोशी (वय 46, रा. उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दीपक सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, प्रियांका राठोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, आर.सी. लोखंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, संजय गोरे यांनी ही कारवाई करून कंटेनर (क्र.टी एन 69 बीबी 2170) ताब्यात घेतला. या कंटेनर मध्ये विदेशी मद्य व बिअरचे 845 बॉक्स असा 65 लाख 90 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल व कंटेनर असा एकूण 86 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक दीपक सुपे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news