पिंपरी : बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची विक्री

पिंपरी : बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची विक्री

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आयटीसी कंपनीच्या बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 97 हजार 700 रुपये किमतीचे बनावट सिगारेटचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. खंडणी विरोधी पथकाने काळेवाडी फाटा येथे ही करावाई केली. मोहनलाल गोमाजी भाटी (51, रा. संभाजीनगर, थेरगाव), गणेश सुवालाल गांधी (34, रा. पवारनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील काही दुकानदार आयटीसी कंपनीचे उत्पादन असलेली बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची विक्री करीत होते. याबाबत आयटीसी कंपनीच्या अधिकार्‍यांनी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली.

त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने आयटीसी कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत मिळून पिंपरी आणि वाकड परिसरात छापे मारले. काळेवाडी फाटा येथे गणेश ट्रेडिंग आणि मुकेश किराणा स्टोअर्स येथे पोलिसांना बनावट कॉपीराईट केलेले सिगारेटचे एकूण 29 आऊटर (एक आऊटरमध्ये 20 पॅकेट) असा 97 हजार 700 रुपयांचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news