पुणे : पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा | पुढारी

पुणे : पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा

पुणे : आगामी चार दिवस पुन्हा राज्यात पावसाळी वातावरण तयार होत असून, मेघगर्जना व विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 15 ते 17 मार्चच्या दरम्यान पावसाळी वातावरणाची तीव्रता अधिक आहे. प्रत्यक्षात पावसापेक्षा बहुतांश भागांत गार वार्‍यांसह ढगाळ वातावरण राहील. या आठवड्यात दिवसाच्या कमाल तापमानातही 2 अंशाने घट होण्याची शक्यता आहे.

जमिनीपासून साधारण 3 ते 7.5 किमी अशा साडेचार किमी हवेच्या थरात मध्य महाराष्ट्र, विदर्भ,मध्य प्रदेशातून उत्तर भारतापर्यंत जाणार्‍या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या सागरातून खेचल्या जाणार्‍या आर्द्रतेच्या ऊर्ध्वगामी गतीमुळे इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

Back to top button