पुणे : गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

पुणे : गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या चार आरोपींना परिमंडळ 5 च्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून बेड्या ठोकल्या आहेत. नुकतेच अशा गुन्ह्यात तपासासाठी कामगिरी करणारे कर्मचार्‍यांचे परिमंडळीय 5 पथक तयार करण्यात आले आहे.
पथकातील अमंलदार सर्फराज आणि नासेर देशमुख यांना मागणी एका वर्षापासून हडपसर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेला व 2021-22 मध्ये टॉप टेन गंभीर गुन्ह्यातील मोस्ट वॉन्टेड असलेलया साहिल उर्फ चपटा अकबर शेख (23, रा. सय्यदनगर, हडपसर) याला अटक करण्यात आली. तो वारंवार राहण्याची ठिकाणे बदलुन पोलिसांनी गुांरा देत होता.

त्याला पोलिसांनी नियोजनबध्द सापळा रचून अटक केले. दरम्यान हडपसर कोंढवा, सिंहगड, वारजे पोलिस ठाण्यात वाहन चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गणेश मानसिंग पवार (28, रा. टिळेकरनगर, कोंढवा) येथून अटक केली. तिसर्‍या कारवाईत फसवणूकीच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून नागरिकांना खोटी गुंठेवारी व खोटे दस्तऐवज बनवुन जमीनीची विक्री केल्याप्रकरणात फरार असलेल्या सुनिल मारूती साळवे (39, रा. उंड्री पिसोळी) याला अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासासाठी वानवडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

दरम्यान पथकातील आनंद पाटोळे व राजु कदम यांना गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या दोघांविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांना पथकाने अटक केली. रोशर सुरेश घाडगे (21) आणि जगदिश सोमनाथ घाडगे (22, दोघे रा. मोरे वस्ती, मांजरी फार्मजवळ, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, पथकातील कर्मचारी राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले, ज्योतिष काळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news