पुणे : मराठी भाषा टिकण्यासाठी पालकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज, सदानंद मोरे यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : मराठी भाषा टिकण्यासाठी पालकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज, सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘सामान्य नागरिक पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊन देतात. मराठी शाळांतील प्रवेश वाढल्यास शाळा बंद करण्याची सरकारचीही हिंमत होणार नाही. हा प्रश्न केवळ सरकारपुरताच मर्यादित नाही. मराठी शाळांतील प्रवेश आणि घरांमध्ये भाषा टिकण्यासाठी पालकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. ते एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदास फुटाणे, कृष्णकुमार गोयल, प्रवीण वाळिंबे यावेळी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, पूर्वीच्या काळातही मराठी भाषेपुढे आव्हान होते, पुढे पर्शियन आणि इंग्रजी असा आव्हानात्मक प्रवास सुरू झाला असला, तरीही मराठी टिकली व विस्तारली आहे.

रामदास फुटाणे यांनी मराठीचा बळी देऊन इंग्रजीचे स्त्रोम माजवू नये. कारण रोजच्या जगण्याची अनुभूती व विविधता केवळ मराठीत असते असे सांगितले. ‘राज्यात ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ग्रामीण भागात अशिक्षित महिला असेपर्यंत मराठीला मरण नाही. केवळ महाराष्ट्रातील मंत्री मराठी भाषेनंतर पुन्हा हिंदी भाषेत बोलतात, तोपर्यंत मराठीला जगण्याची आशा नाही’, असेही ते म्हणाले.

 

Back to top button