पुणे: मैत्रिणीला घरी बोलवत दिली भलतीच ऑफर, नकार दिला म्हणून चोरीचा आळ घेऊन केली मारहाण | पुढारी

पुणे: मैत्रिणीला घरी बोलवत दिली भलतीच ऑफर, नकार दिला म्हणून चोरीचा आळ घेऊन केली मारहाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एका महिलेने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावत दोघांबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर’ दिली. दरम्यान पिडीतेने नकार देताच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्यावर चोरीचा आळ घेऊन शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात एक महिला आणि तिच्या दोन पुरुष साथीदारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बालाजीनगर धनकवडी येथील एका कॉम्पलेक्समध्ये घडली. याबाबत 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या केअर टेकरचे काम करतात. तर आरोपी महिला ही तिची मैत्रिण आहे. तिने फिर्यादी महिलेला 9 मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आपल्या घरी बोलावून घेतले होते. तेव्हा तेथे तिचे दोन पुुरुष साथीदार मित्र उपस्थित होते. आरोपी महिलेने पिडीतेस तू त्या दोघांना खुप आवडतेस, तु त्यांच्या सोबत शारीरीक संबंध ठेव , मी त्यांना चार ते पाच हजार रुपये देण्यास सांगते असे सांगितले. परंतु, पिडीतेने नकार देताच तिने पिडीतेवर पैसे चोरल्याचा आळ घेत भांडण केले. पिडीता खोलीतून बाहेर येताच दोघाही आरोपींनी तीचा विनयभंग करत मारहाण केली. पिडीतेने कशीबशी सुटका करत तेथून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button