पिंपरी : लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डोस

पिंपरी : लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डोस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले जाणार आहेत. कोव्हिशिल्ड आणि कोर्बेव्हॅक्स उपलब्ध नसल्याने त्यांचे डोस दिले जाणार नाहीत. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार वय वर्षे 14 व पुढील सर्व नागरिकांना 'कोव्हॅक्सिन' लसीचा पहिला, दुसरा डोस व 18 वर्षावरील नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. केंद्र स्तरावर कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या 50 टक्के जणांना तर, ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या 50 टक्के जणांना लस देण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार या वेळेत केले जाणार आहे.

महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर गरोदर माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय आदींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. पहिल्या लसनंतर 28 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेता येईल. तर, लसीच्या दुसर्या डोसनंतर ज्यांनी 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना प्रिकॉशन डोस घेता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news