पिंपरी : शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन | पुढारी

पिंपरी : शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 21 दिवसांचा कालावधी राहिला आहे. नागरिकांना मूळ मिळकतकर भरण्यासाठी अडचण येऊ नये, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेने विभागीय करसंकलन कार्यालयात कॅश काऊंटर वाढविले आहेत. मूळ मिळकतकराचा भरणा केल्यानंतर ऑनलाईन स्वरुपात अनधिकृत शास्ती माफीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अनधिकृत बांधकाम शास्ती माफीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी pcmcindia.gov. in या संकेतस्थळावरील अनधिकृत शास्ती माफी प्रमाणपत्र या लिंकद्वारे आपली सर्व माहिती भरावी. यामध्ये आपणास झोन क्रमांक, गट क्रमांक, मालमत्ता क्रमांक, वाढीव क्रमांक भरावा. त्यानंतर त्यांनी मूळ मिळकतकराचा भरणा केला नसल्यास विविध पर्यायाद्वारे भरणा करावा. ज्यांनी यापूर्वी भरणा केला आहे त्यांनी आपली माहीती भरून प्रमाणपत्र प्राप्त करावे. जे नागरिक कॅश काऊंटरद्वारे मूळ मिळकतकराचा भरणा करणार आहेत त्यांनी आपल्या झोन मधील कॅश काऊंटरच्या माध्यमातून मूळ कराचा भरणा करावा. त्यांना मूळ कराचा भरणा केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र मिळू शकेल.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षामध्ये 6 हजार 257 मिळकतधारकांनी 41 कोटी 45 लाख रुपयांचा मूळ मिळकतकराचा भरणा केला आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल 113 कोटी रुपयांची अनधिकृत बांधकाम शास्ती माफ करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी विभागीय करसंकलन केंद्रांवर मदत कक्ष
ज्या नागरिकांना मूळ मिळकतकराचा भरणा करायचा असेल त्यांनी विभागीय करसंकलन कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकार्‍यांची मदत घ्यावी. त्याचे नाव व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये राजेंद्र कुंभार, आकुर्डी-9922502122, रमेश चोरघे, चिंचवड-9922502650, सीताराम मुंढे, थेरगाव-922502063, जयश्री साने, सांगवी-9922902271, सुषमा भरवीरकर, पिंपरीगाव-822497389, महादेव चेरेकर, पिंपरी कॅम्प-9921913118, संतोष कोराड, पालिका भवन-8308973427, सुचेता कुलकर्णी, फुगेवाडी-दापोडी-9922502124, राजू मोरे, भोसरी-9922932553, श्रध्दा बोर्डे, चर्‍होली, मोशी-8805538300, संजय लांडगे, चिखली-7020434155, संजय तळपाडे, तळवडे-9760319570, अभिजित देवकर, किवळे-9922504489, रमेश मलये, दिघी-बोपखेल-9881798331, जयवंत निरगुडे, वाकड – 9011488957 यांकडून नागरिक मदत घेऊ शकतात.

Back to top button