पुणे : रेल्वेस्थानकात रॅम्प दिव्यांगांना होणार खुला

पुणे : रेल्वेस्थानकात रॅम्प दिव्यांगांना होणार खुला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वेस्थानकावर असलेला जुना एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) रॅम्प आता फक्त दिव्यांग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावर गाडीमध्ये जाताना होणारे दिव्यांगांचे हाल कमी होणार आहेत. तसेच, यासोबतच
रेल्वेस्थानकावरील व्हीलचेअरची संख्यासुध्दा वाढविण्यात येणार आहे. पुणे रेल्वेस्थानकावरील रॅम्प धोकादायक असल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने तो काही वर्षांपूर्वी बंद केला होता.

अजूनही हा रॅम्प बंदच आहे. परंतु, रॅम्प बंद असल्यामुळे दिव्यांगांना स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून इतर प्लॅटफॉर्मवर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रशासन फक्त दिव्यांगांच्या सोयीसाठी हा रॅम्प खुला करणार आहे. दिव्यांगांना येथून घेऊन गेले की हा रॅम्प पुन्हा बंद केला जाणार आहे.

व्हीलचेअर आणि बॅटरी गाडीची सुविधा…
पुणे रेल्वेस्थानकावर 14 व्हीलचेअर
आहेत. आता त्यामध्ये प्रशासन वाढ
करणार आहे. तब्बल 20 व्हीलचेअर
प्रशासन नव्याने खरेदी करणार असून,
येथील बॅटरी गाड्या देखील दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिव्यांगांना पुणे रेल्वेस्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर जाताना येणार्‍या अडचणी लक्षात घेत आम्ही येथील जुना एफओबी रॅम्प फक्त दिव्यांगांसाठी खुला करणार आहोत. त्याकरिता आम्ही रेल्वेस्थानकावर नियोजन केले असून, लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येईल.

                                                        – इंदू दुबे,
                                     विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news