रेल्वेचा पुणे विभाग उत्पनात सुसाट; अकरा महिन्यात कमविले १ हजार ३४६ | पुढारी

रेल्वेचा पुणे विभाग उत्पनात सुसाट; अकरा महिन्यात कमविले १ हजार ३४६

प्रसाद जगताप

पुणे : मागील एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या अकरा महिन्यांच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाला पुणे विभागामार्फत 1 हजार 346 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. हा महसूल प्रवासी तिकीट विक्री, गुडस आणि छोटे-मोठे पार्सल वाहतूक, फुकट्या प्रवाशांचा दंड याद्वारे मिळाला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाचा उत्पन्न मिळविण्यात देशात दहावा क्रमांक लागतो. पुणे विभागाअंतर्गत 50 ते 60 छोटी मोठी स्थानके आहेत. त्यास्थानकांच्या माध्यमातून प्रशासनाला हा महसूल मिळाला आहे. त्यामुळे रेल्वे अधिकारी खूश असून, आणखी महसूल कसा वाढेल, याकरिता आता जोरदार प्रयत्न करत आहेत.

पुणे विभागाला मिळालेला महसूल (एप्रिल 2022 ते फेब्रु. 2023)
प्रवासी तिकीट उत्पन्न – 930 कोटी
गुड्स वाहतूक – 370 कोटी
पार्सल – 26 कोटी
फुकटे प्रवासी केसेस – 2 लाख 73 हजार 427
फुकटे प्रवासी दंड – 20 कोटी 41 लाख 15 हजार 811

  • पुणे विभागाचे सरासरी दिवसाचे प्रवासी (ये-जा) – 2 लाख 56 हजार
  • पुणे विभागाचे सरासरी दिवसाचे उत्पन्न – 2 कोटी 80 लाख रूपये

नव्याने घरपोच टपाल सेवा…
रेल्वे प्रशासनाने टपाल विभागाच्या सहकार्याने नुकतीच घरपोच टपाल सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून सुध्दा पुणे विभागातून पार्सल वाहतूक सुरू आहे. सध्या ही सेवा नवीन असली तरी प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Back to top button