पुणे: अकरा वर्षांच्या मुलीचा शाळेत विनयभंग | पुढारी

पुणे: अकरा वर्षांच्या मुलीचा शाळेत विनयभंग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शाळेच्या तळमजल्यावरून वर्गात जाताना एकाला दादा शाळा भरली का, अशी विचारणा केल्यानंतर अकरा वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या आवारात घडला. याप्रकरणी 18 ते 20 वर्षांच्या आरोपीवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे करत आहेत.

Back to top button