पुणे: आरोपीकडून 50 हजार रुपये घेणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित | पुढारी

पुणे: आरोपीकडून 50 हजार रुपये घेणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आरोपीकडून 50 हजार रुपये घेणार्‍या अलंकार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यााचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले.

अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे डहाणूकर कॉलनी पोलिस चौकीत नियुक्तीस आहे. घराच्या मालकी हक्कावरून एरंडवणे भागातील अलंकार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला नव्हता. मात्र, शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला मोबाईलवर संदेश पाठवून पोलिस चौकीत बोलावून घेतले. आरोपीला अटक करण्याची भीती घालून शिंदे यांनी त्याच्याकडून 50 हजार रुपये घेतले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी शिंदे यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने शिंदे यांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यााचे आदेश देण्यात आले.

Back to top button