पुणे: ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या डॉक्टरला कारने उडवले | पुढारी

पुणे: 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या डॉक्टरला कारने उडवले

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भरधाव वेगातील कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या डॉक्टरला उडवले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना काळेवाडी येथे घडली. डॉ. बळीराम बाबा गाढवे (४७, रा. केशवनगर, चिंचवड) असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बळीराम गाढवे हे काळेवाडी बीआरटी मार्गाजवळ मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने गाढवे यांना जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर गाढवे हे ५ फूट हवेत उडून रस्त्यावर आपटले. यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कार चालकाचा शोध सुरू केला आहे.

Back to top button