पुण्याला स्वतंत्र विमानतळ हवे; हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत | पुढारी

पुण्याला स्वतंत्र विमानतळ हवे; हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत

पुणे : ‘सध्याचे विमानतळ लष्कराचे आहे. येथे हवाई दलाच्या विमानांना दररोज सराव करावा लागतो. त्यामुळे प्रवासी विमानांची उड्डाणे काही काळ थांबवावी लागतात. परिणामी, प्रवासी उड्डाणांचे स्लॉट कमी होतात. त्यामुळे पुणेकरांसाठी स्वतंत्र विमानतळ असणे गरजेचे आहे,’ असे मत हवाई वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आत्ताच्या बजेटमध्ये स्वतंत्र असलेल्या पुरंदर विमानतळासाठी तरतुदीचे नियोजन आहे. मात्र, हे विमानतळ आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. लोहगाव येथील विमानतळावर दिवसेंदिवस प्रवाशांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी पुणेकरांसाठी स्वतंत्र विमानतळ असणे महत्त्वाचे आहे.

सरकारने आता पुरंदर विमानतळाच्या बाबतीत तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असून, सततच्या भ्रमनिराशेने भविष्यात याचा पुण्यातील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वंडेकर म्हणाले.
शिर्डी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथील विस्तारीकरणासाठी, नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी झालेल्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत. अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी येथे विमानतळ विकासाच्या झालेल्या घोषणा स्वागतार्ह असल्या, तरी पुरंदर विमानतळाबाबतीत या अर्थसंकल्पाने पुणेकरांची पुन्हा निराशाच केली आहे, असे हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.

Back to top button