पारगाव : अवकाळीच्या भीतीने वीट व्यावसायिक धास्तावले | पुढारी

पारगाव : अवकाळीच्या भीतीने वीट व्यावसायिक धास्तावले

पारगाव(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाच्या भीतीमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वीट व्यावसायिक धास्तावले आहेत. कच्च्या विटा भिजू नयेत यासाठी त्यांनी प्लास्टिक कागदाने विटा झाकल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात खडकी, जारकरवाडी, धामणी परिसरात वीट व्यावसायिक आहेत.

गेले दोन ते तीन दिवसांपासूनच वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कच्च्या विटांवर या व्यावसायिकांनी प्लास्टिक कागद झाकले होते. सोमवारी (दि. 6) सायंकाळच्या सुमारास व मंगळवारी (दि. 7) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वीटभट्ट्यांमध्ये कच्च्या विटा मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत. या विटांच्या संभाव्य नुकसानीमुळे हे व्यावसायिक धास्तावले आहेत.

Back to top button