आंबेगावात 7 टन मटण, 30 हजार कोंबड्या फस्त | पुढारी

आंबेगावात 7 टन मटण, 30 हजार कोंबड्या फस्त

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात धुळवडीनिमित्त ग्राहकांनी चिकन व मटणावर मोठ्या प्रमाणात ताव मारला. सात टन
मटण आणि जवळपास 30 हजार कोंबड्या विक्री झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली. धुळवडीनिमित्त मटण खाण्याची प्रथा असल्यामुळे चिकन व मटण दुकानात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तालुक्यातील 103 गावांमध्ये 400 ते 425 चिकन व्यावसायिक, तर 20 ते 25 मटण व्यावसायिक आहेत.

धुळवडीनिमित्त मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची विक्री झाल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन सेंटरचे विक्रेते इसाक शेख आणि एकलहरे येथील चॉईस मटण शॉपचे विक्रेते शेखर कांबळे यांनी दिली. पाच-सहा दिवसांपूर्वी 170 रुपये किलो दराने मिळणारे चिकन अचानक मागणी वाढल्याने दहा ते पंधरा रुपयांनी महाग होत 180 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाल्याचे ब्रॅायलर कोंबडीचे व्यापारी जावेद मिस्त्री यांनी सांगितले. बोकड आणि मेंढराच्या मटणालाही मागणी वाढल्याने मटण 660 ते 700 रुपये किलो दराने विकल्याची माहिती शेखर कांबळे यांनी दिली.

अंड्यांच्या बाजारभावात मात्र मोठी घसरण
अंड्यांच्या बाजारभावात मात्र अचानक मोठी घसरण झाली असून, अंडी उत्पादक अडचणीत आल्याचे वैदवाडी येथील अंडी उत्पादक सागर तापकीर, कांताराम टाव्हरे, लौकी येथील उद्योजक गोविंद थोरात, निकेतन दैने, महाळुंगे पडवळ येथील नितीन बारवे, चांडोली येथील शंकर थोरात यांनी सांगितले. अंड्यांचे बाजारभाव होलसेल दराप्रमाणे 455 रुपये शेकडा आहे. प्रत्यक्ष अंडी उत्पादनासाठी होणारा खर्च आणि प्रत्यक्ष विक्री, याचा ताळमेळ घातला तर तोटा वाढल्याचे मारुती बढेकर यांनी सांगितले.

Back to top button