पिंपरी : तळेगाव दाभाडे नगर परिषद : 4 लाख 24 हजारांचा शिल्लकीचा अंदाजपत्रक | पुढारी

पिंपरी : तळेगाव दाभाडे नगर परिषद : 4 लाख 24 हजारांचा शिल्लकीचा अंदाजपत्रक

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 2023 – 24 चे अंदाजपत्रक प्रारंभिक शिलकेसह सादर करण्यात आले आहे. 297 कोटी 48 लाख 24 हजार 895 रुपये जमेचे हे अंदाजपत्रक 4 लाख 24 हजार 895 रुपये शिलकेचे आहे. अंदाजपत्रकामध्ये कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वर्षाला 297 कोटी 44 लाख खर्च अपेक्षित
प्रशासन अधिकारी संदेश शिर्के व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व नगर परिषदेची नवीन कार्यालयीन इमारत बांधणी या कामांवर विशेष तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या खर्चांसाठी 297 कोटी 44 लाख खर्च अपेक्षित धरला आहे.

विविध विकासकामांवर भर
उत्पन्नातून आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, कार्यालयीन खर्च, प्रवास, वाहतूक, इंधन, जाहिरात, मालमत्ता दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, वीजबिल, पाणीपुरवठा कामाचे आणि व्यवहाराचे कंत्राट, कार्यक्रम खर्च, स्वच्छता अभियान खर्च, नवीन रस्ते बांधणी व दुरुस्ती, पदपाथ , प्रसाधन गृहे, बांधकाम, शिक्षण, क्रीडा, उद्यान आदी विकासकामांवर 254 कोटी 18 लाख 60 हजार 713 रुपये खर्च दर्शविलेला आहे. जमेच्या बाजूकडून येणारी रक्कम जास्त असून, खर्चाची रक्कम कमी असल्याने हे शिलकेचे अंदाजपत्रक झाले असल्याचे लेखापरीक्षक तथा लेखापाल कैलास कसाब यांनी सांगितले.

आस्थापना – 12 कोटी 20 लाख
प्रशासकीय खर्च – 21 कोटी 50 लाख
नगरपरिषद मालमत्त्यांच्या दुरुस्ती – 17 कोटी 78 लाख
इतर किरकोळ दुरुस्त्या अनुदाने व अंशदाने – 8 कोटी 14 लाख
नवीन प्रशासकीय इमारत – 15 कोटी
भुयारी गटार योजना – 20 कोटी
नाट्यगृह बांधणे – 3 कोटी 60 लाख
वैशिष्टपूर्ण योजना अनुदान – 28 कोटी
पंधरावा वित्त आयोग – 6 कोटी
जिल्हा नगरोत्थान योजना – 45 कोटी
राज्य नगरोत्थान योजना – 30 कोटी
उद्याने विकसित करणे – 20 कोटी
पंतप्रधान आवास योजना – 3 कोटी
शहरातील प्रकाश योजना – 15 कोटी
इतर विकास कामे 29कोटी 16 लाख
महिला व बालकल्याण निधी – 93 लाख 52 हजार 975
दिव्यांग निधी – 93 लाख 52 हजार 975
आर्थिक दुर्बल घटक निधी – 93 लाख 52 हजार 975

Back to top button