दौंड : प्रशिक्षण घेणार्‍या दलित मुलीवर बलात्कार | पुढारी

दौंड : प्रशिक्षण घेणार्‍या दलित मुलीवर बलात्कार

दौंड; पुढारी वृत्तसेवा : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या दौंड येथील दलित युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याची फिर्याद पीडितेने दौंड पोलिस ठाण्यात दिली आहे. आरोपी अतुल वामनराव कुतवळ व एक महिला (दोघे रा. आलेगाव, दौंड) यांच्याविरोधात बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी अतुल कुतवळ यास अटक केली आहे.

आरोपी अतुल हा देखील पोलिस भरतीसाठी तयारी करीत होता. यादरम्यान पीडितेची व आरोपीची ओळख झाली. आरोपीने पीडितेला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता, तू मागासवर्गीय समाजाची असल्याकारणाने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगून तिची फसवणूक केल्याने पीडितेने आरोपी अतुल कुतवळविरोधात दौंड पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

Back to top button