पिंपरी : धुळवडला मद्यपींची धरपकड | पुढारी

पिंपरी : धुळवडला मद्यपींची धरपकड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार्‍या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 7) वाहतूक विभागाने तब्बल 50 जणांवर कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळवड म्हटलं की तळीरामांच्या आनंदाला पारावर उरत नाही. शहरातील छोट्या मोठ्या गल्ल्यांमध्ये अनेक टोळकी मद्यधुंद अवस्थेत धुळवड खेळत असल्याचे पहावयास मिळते. यातूनच अनेकदा वाद देखील होतात.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मंगळवारी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच, वाहतूक विभाग दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, दिवसभर 50 तळीराम वाहतूक पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत पोलिसांनी जरब बसवण्याचा प्रयत्न केला.

हिंजवडी आयटी परिसरात सर्वाधिक कारवाई
आयटीनगरी अशी ओळख असलेल्या हिंजवडी परिसरात दारूच्या नशेत फिरणार्‍या तरुणांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे हिंजवडी वाहतूक विभागाने सर्वाधिक म्हणजेच 16 तळीरामांवर कारवाई केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

 

Back to top button