पुणे : लहानग्यांच्या भांडणातून मोठयांमध्ये हाणामारी! | पुढारी

पुणे : लहानग्यांच्या भांडणातून मोठयांमध्ये हाणामारी!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांची खेळताना भांडणे झाल्याने दोन कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सचिन प्रभाकर आव्हाळे (वय 38, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य दादासाहेब आव्हाळे, महेश संभाजी कुटे, कौशल कैलास आव्हाळे, सिद्धांत प्रवीण आव्हाळे, कैलास किसन आव्हाळे, दादासाहेब गोविंद आव्हाळे, मंदाकिनी दादासाहेब आव्हाळे, अदिती दादासाहेब आव्हाळे, सुवर्णा प्रवीण आव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रवीण विठ्ठल आव्हाळे (वय 40, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सचिन पीराजी आव्हाळे, नामदेव पीराजी आव्हाळे, पल्लवी सचिन आव्हाळे, नामदेव पीराजी आव्हाळे यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक कोळपे आणि लिंगे तपास करीत आहेत.

Back to top button