धक्कादायक ! गाडी पार्किंगच्या वादातून दात पाडले | पुढारी

धक्कादायक ! गाडी पार्किंगच्या वादातून दात पाडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आईस्क्रीम खात असताना मोटार पार्किंग केल्याच्या रागातून टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला करीत एकाच्या तोंडावर दगड मारून त्याचे पाच ते सहा दात पाडल्याचा प्रकार 5 मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास मांजरी बुद्रुकमधील भंडलकरनगर कमानीजवळ घडला. याप्रकरणी संतोष भंडारी, गौरव भंडारी, तेजस कलाल, सौरभ मेमाने, प्रणव माने, आर्यन पवार (सर्व रा. शेवाळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

संग्राम हरपळे आणि विक्रांत साळुंखे अशी जखमींची नावे आहेत. फिर्यादी संग्राम हे त्यांचे मित्र विक्रांतसह आईस्क्रीम खाण्यासाठी भंडलकरनगर कमानीजवळ गेले होते. त्या वेळी त्यांनी मोटार परिसरात पार्किंग केली. त्याचा राग आल्यामुळे परिसरातील एकाने टोळक्याच्या मदतीने दोघांना बेदम मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.

Back to top button