धायरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर | पुढारी

धायरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडरोड परिसरातील धायरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हॅमर जिम आणि ओरॅकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुनिल चव्हाण यांच्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले. यावेळी तीनशे नागरिकांनी याचा लाभ घेतला. मधुमेह, कॅन्सर, लिव्हर, किडनी इत्यादी होणाऱ्या आजारापासून कसे वाचावे या विषयी मार्गदर्शन, ग्राव्हीटी योगा आणि सी पी आर प्रथमोपचार याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

Back to top button