पुणे : डॉक्टरने मित्र-मैत्रिणीचे संबंध शूट केले; चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी

पुणे : डॉक्टरने मित्र-मैत्रिणीचे संबंध शूट केले; चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तरुणीला गुंगीचे औषध पाजून मित्राला त्या तरुणीशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे चित्रीकरण पेशाने डॉक्टर असलेल्या सागर दिलीप काकडे (38, रा. तळेगाव दाभाडे) याने केले आहे. या प्रकरणात त्याचा मित्र मयूर साळवे (रा.
लोणावळा) याच्यावर बलात्कार व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 वर्षीय पीडित तरुणी धनकवडी येथे राहते. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आरोपी सागरने याचा फायदा घेत तिच्याशी जवळीक वाढवली. यानंतर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सागरने पीडितेच्या मोबाईलवरून मित्र मयूरशी पीडिता चॅटिंग करत असल्याचे भासवत काही संदेश पाठवले. यानंतर त्याला आणि पीडितेला लॉजवर नेण्यात आले. तेथे पीडितेला थंड पेयातून गुंगीचे औषध देण्यात आले.

बेशुद्ध पडल्यावर मयूरला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. या सर्व संबंधाचा व्हिडिओ शूट करण्यात आला.
यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दारू पाजून पुन्हा तिचे अश्लील व्हिडिओ काढून दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉ. काकडेला अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news