पिंपरी : मसाल्यांच्या पदार्थांसह मिरचीचे दरही भडकले | पुढारी

पिंपरी : मसाल्यांच्या पदार्थांसह मिरचीचे दरही भडकले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून ऐन हंगामातच जिरे आणि बडीशेप ह्या मसाल्यासाठी लागणार्‍या पदार्थांची आवक घटल्याने या मसाल्यासह मिरचीच्या दरातही वाढ झाली आहे. तर वेलचीच्या दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणींना हळद, मिरची कांडून आणून वर्षभर पुरेल इतका मसाला घरात साठवण करून ठेवतात. मात्र या उन्हाळ्यात मिरचीच्या दरातही वाढ झाल्याने गृहिणींचा हिरमोड झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात लाल मिरचीची आवक होते. गेल्या महिन्यात आवक झाल्याने मिरचीच्या दरात घट झाली होती. या काळात मिरचीच्या उत्पादनाची बाजारात मोठी आवक होत असते. परंतु या वेळी ऐन हंगामातच मिरचीचा तुटवडा जाणवत आहे.
गुजरातमधून आयात होणारे जिरे आणि बडीशेप, तर केरळमधून येणारी वेलची या मसाल्याची आवक घटल्याने परिणामी दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

बाजारात जिरे, बडीशेप, वेलची आणि मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळे दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
                                                                      – पंकज सावदेकर, विक्रेता, पिंपरी.

मसाला पदार्थ
(दर प्रतिकिलो रुपये)
जिरे 400
बडीशेप 250
वेलची 1700
मिरची प्रकार
लवंगी 260
बेडगी 600
संकेश्वरी 300
गुंटूर 300

Back to top button