पिंपरी : गोपनीय माहितीच्या आधारे 21 लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : गोपनीय माहितीच्या आधारे 21 लाखांची फसवणूक

पिंपरी : बँक खात्याच्या गोपनीय माहितीचा वापर करून कंपनीची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 25 ते 26 सप्टेंबर या कालावधीत एमआयडीसी चिंचवड येथील परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस या कंपनीत घडला. आनंद दिगंबर शुक्रे (42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, मंताजूल इस्लाम मुल्ला (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुल्ला याने परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या नावावर असलेले सिमकार्ड डीअ‍ॅक्टिव्हेट करण्याबाबत कंपनीला मेल पाठवला. सिमकार्ड बंद करून मोबाईलमध्ये असलेली कंपनीच्या बँक खात्याची माहिती वापरून मुल्ला याने कंपनीच्या खात्यातून दोन टप्प्यात 21 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित करून घेतले.

Back to top button