पुणे : महिलांसाठी खुशखबर ! दर महिन्याच्या 8 तारखेला पीएमपीचा मोफत प्रवास | पुढारी

पुणे : महिलांसाठी खुशखबर ! दर महिन्याच्या 8 तारखेला पीएमपीचा मोफत प्रवास

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपीचा गेल्या अनेक दिवसांपुर्वी बंद पडलेल्या ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यानुसार महिलांना आता ‘तेजस्विनी’बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्ष नयना गुंडे यांनी पहिल्यांदा महिलादिनानिमित्त या उपक्रमाला सुरूवात केली होती.

मात्र,त्यांच्यानंतरच्या अध्यक्षांनी आणि अधिकारी वर्गाने या उपक्रमाबाबत उदासिनताच दाखविली. याचा उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे सांगत हा उपक्रम बंद पडला. त्यामुळे दर महिन्याच्या 8 तारखेला पुणेकर महिलांना मिळणारा मोफत प्रवास बंद झाला. मात्र, सध्याचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी हा उपक्रम पुन्हा सुरू केला असून, त्यामुळे आता येथून पुढे पुणेकर महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला मोफत प्रवास करता येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या 8 तारखेपासून शहरात सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button