बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण | पुढारी

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयांतील चुकांचे 6 गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य मंडळाने जाहीर केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर. औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून आयोजित करण्यात आलेली आहे.

दि. २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी “इंग्रजी” विषयाची परीक्षा झाली आहे. प्रचलित पध्दतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाने प्रमुख नियामक याच्या समवेत 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आली. इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळून आल्या असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास येत सदर अहवालानुसार त्रुटी असलेल्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना पुढील परिस्थितीमध्ये देण्यात येतील.

१. Poetry Section-2/ Poetry / Section-2 असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास, २. Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास, ३. त्रुटी असलेल्या प्रश्नाचे क्रमांक (A-3, A-4, 4-5 असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उपरोक्त तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी केले असल्यास विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे ०२ याप्रमाणे एकूण ०६ (सहा) गुण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button