पिंपरी : अश्विनी जगताप शहराच्या पहिल्या महिला आमदार | पुढारी

पिंपरी : अश्विनी जगताप शहराच्या पहिल्या महिला आमदार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मिळाला आहे. त्यामुळे शहरातील आमदारांची संख्या चार झाली आहे. भाजपचे सर्वांधिक तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक झाली.

त्यात अश्विनी जगताप या विजयी झाल्या. त्यांनी भाजपचा गड कायम राखला. त्यामुळे त्या पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. यापूर्वी भाजपच्या आमदार उमा खापरे या विधान परिषदेवर निवडून आल्या आहेत. त्या शहरातील पहिला महिला आमदार असल्या तरी, प्रत्यक्ष निवडणूक लढवून लोकांतून विजयी झालेल्या अश्विनी जगताप या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे, विधान परिषदेच्या आ. उमा खापरे आणि आता चिंचवड विधानसभेच्या आ. अश्विनी जगताप असे भाजपचे तीन आमदार आहेत. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत.

Back to top button