पिंपरी : आरटीई मदत केंद्राकडे पालकांची पाठ | पुढारी

पिंपरी : आरटीई मदत केंद्राकडे पालकांची पाठ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरण्याचे संकेतस्थळ सुरू करण्यात करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मदत केंद्रांची यादी जाहीर केली नव्हती. . आरटीई अर्ज भरण्यास 1 मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. सायबर कॅफमध्ये जावून पैसे खर्च न करता पालकांनी जवळच्या आरटीई मदत केंद्रात जावून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाकडून केले जाते.

11 मदत केंद्र
आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांनी महापालिकेने आरटीईची 11 मदत केंद्र दिली आहेत. मात्र, मदत केंद्रांची नावे अर्ज भरण्याच्या दिवशीच जाहीर केल्यामुळे बहुतांश पालकांना मदत केंद्राविषयी कोणतीच माहिती नाही. त्यामुळे मदत केंद्राकडे पालक फिरकलेच नाहीत. आरटीईसाठी काही सामाजिक संस्था, नगरसेवक देखील त्यांच्या कार्यालयात आरटीई अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याकडे जावून पालकांनी मदत घेतली. यापूर्वी दरवर्षी वेबसाईट ओपन होत नसल्यामुळे किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे पालकांना अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळी देखील संकेतस्थळ दुपारी तीन नंतर थोडा वेळ सुरु झाले नंतर बंद पडले. याकारणास्तव पालकांना पहिल्या दिवसापासून अर्ज भरता आले नाही. पालिकेने मदत केंद्रावर प्रत्येक शाळेने एक कॉम्प्युटर, ऑपरेटर आणि प्रिंटरची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे.

आरटीई मदत केंद्रांची नावे
1) फकिरभाई पानसरे प्राथमिक उर्दू शाळा, आकुर्डी, 2) कल्पना इंग्लिश मिडियम स्कूल, निगडी, 3) जी.एस.के. इंग्लिश मिडियम स्कूल, जाधववाडी, 4) सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल भोसरी, 5) एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी, 6) किड्स पॅराडाईस इंग्लिश मिडियम स्कूल चर्‍होली, 7) इन्फंट जिजस स्कुल कासारवाडी, 8) एम.एम. स्कूल काळेवाडी, 9) एस.पी. स्कूल. वाकड, 10) किलबिल स्कुल पिंपळे गुरुव, 11) बी. टी. मेमोरियल स्कूल काळेवाडी.

 

संकेतस्थळ संथ गतीने सुरू आहे. पालकांना युजर आयडी, पासवर्ड, मेसेज जात नाहीत. आज आलेले दहा ते पंधरा पालक प्रतीक्षेत आहेत. आज एकही अर्ज भरला गेला नाही.
– शरण शिंगे, उपाध्यक्ष, आरटीई पालक संघ

Back to top button