इंदापूर : हा विजय म्हणजे दडपशाही विरोधातील एल्गार; खा. सुप्रिया सुळे यांचे मत | पुढारी

इंदापूर : हा विजय म्हणजे दडपशाही विरोधातील एल्गार; खा. सुप्रिया सुळे यांचे मत

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : कसब्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक करीत हा विजय म्हणजे छत्रपतींचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने दडपशाहीच्या आणि पैसे वाटण्याच्या प्रथेविरोधातील एल्गार असल्याचे परखड मत मांडले. सत्तेतील वरिष्ठ लोक साम, दाम, दंड, भेद काहीही करा, पण निवडणूक जिंका, या विरोधातील हा कल असल्याचे त्यांनी म्हटले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. 2) इंदापूर तालुक्यात भाटनिमगाव येथे ही प्रतिक्रिया दिली. खा. सुळे म्हणाल्या, की मतांचे विभाजन झाले तरच भारतीय जनता पार्टी निवडून येते. चिंचवडमधील भाजपची आघाडी ही त्यामुळेच आहे. सर्वसामान्य जनता ही भाजपाच्या विरोधात मतदान करते. हे मतदान भाजपने राबविलेली धोरणे, महागाई याच्या विरोधातील जनतेचा हा कल आहे.

 

Back to top button