पुणे : तहसीलदार कार्यालयासमोर महिलांनी पेटवली चूल ; गॅस दरवाढीचा खेड राष्ट्रवादीकडून निषेध | पुढारी

पुणे : तहसीलदार कार्यालयासमोर महिलांनी पेटवली चूल ; गॅस दरवाढीचा खेड राष्ट्रवादीकडून निषेध

राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा :  गॅस दरवाढी बरोबरच दैनंदिन व्यवहारात रोज महागाई वाढत आहे. त्यावरून केंद्र सरकारच्या विरोधात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी(दि. ३) खेड तहसीलदार कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. सहभागी महिला आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर चुल पेटवली. त्यावर स्वयंपाक करताना केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष भारती शेवाळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई चांभारे,दुध संघाचे संचालक अरुण चांभारे, तालुकाध्यक्षा संध्या जाधव,राजगुरूनगर शहराध्यक्ष मनिषा सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अँड्. मनीषा टाकळकर,आशाताई तांबे,सुजाता पचपिंड,कोहिणकरवाडीच्या सरपंच वैशाली कोहिणकर, सागर सातकर,संतोष भांगे,वैभव नाईकरे,नितीन गुरव आदी सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

Back to top button