पुणे : दौंडला रेल्वेच्या रँकला लागली आग ; थोडक्यात टळला अनर्थ | पुढारी

पुणे : दौंडला रेल्वेच्या रँकला लागली आग ; थोडक्यात टळला अनर्थ

दौंड: पुढारी वृत्तसेवा : दौंड रेल्वे यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅक मधील एका बोगीला शुक्रवारी( दि.३) सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता ही आग चांगलीच पेटली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशामक गाडी मागून आग आटोक्यात आणली
परंतु ही आग कशी लागली याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून तर्कवितर्क काढले जात आहेत.

विशेष म्हणजे ज्या बोगीला आग लागली तेथून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा हा केवळ पन्नास फुटावर होता जर दौंड नगरपालिकेचा अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचले नसते तर संपूर्ण गाडीनेच पेट घेतला असता या घटनेमध्ये जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र भरपूर झाली आहे रेल्वे अधिकारी याचा तपास करत आहेत

Back to top button