पुणे : फक्त घाम नाही, बालेकिल्ला फोडला…सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘फुल्ल दंगा’ | पुढारी

पुणे : फक्त घाम नाही, बालेकिल्ला फोडला...सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘फुल्ल दंगा’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दुपारी बारा वाजता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा कल कळल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ट्रेंडींगमध्ये आले. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात असला, तरी मतदारांना गृहीत धरू नका, असा सल्ला नेटकर्‍यांनी दिला आहे.

सर्वाधिक स्टेट्स आणि फिरलेल्या व्हिडीओ मिम्समध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रचारादरम्यानचा ’हू इज धंगेकर’ हा प्रश्न होता… ’आता कळलं का हू इज धंगेकर? फक्त घाम नाही, तर बालेकिल्ला फोडला’ अशा शब्दात उत्तर देण्यात आले. दुपारी तीनपर्यंत रवींद्र धंगेकर टि्वटरवर देशात टॉप 30 मध्ये ट्रेंडींगला होते.

सोबतीला पुणेरी टोमणेही
नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवायला हव्यात, नाहीतर मतदार तुम्हाला जागा दाखवेल, असा सल्लाही काही नेटीझन्सनी दिला. कसब्याच्या निकालाचे कल येण्यास सुरुवात झाल्यापासून व्हिडीओ मिम्स आणि सल्ला देणारे पुणेरी टोमणे सोशल मीडियावर ट्रेंड करत होते.

Back to top button