हा विजय सर्वसामान्य जनता आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित: अश्विनी जगताप | पुढारी

हा विजय सर्वसामान्य जनता आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित: अश्विनी जगताप

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. जगताप यांनी 36 हजार 168 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते पडली. नाना काटे यांना 99 हजार 343 मते पडली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 82 मते पडली.

विजयी झाल्यानंतर बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या की, “मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी ठाम उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. मला अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. जनतेसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, असं देखील जगताप यांनी म्हटलं आहे.

Back to top button