चिंचवड पोटनिवडणुक: भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला एकच जल्लोष | पुढारी

चिंचवड पोटनिवडणुक: भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला एकच जल्लोष

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय दृष्टीपथास येत असताना दुपारी साडेचारच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. 31 व्या फेरी अखेर त्यांनी एक लाख 16 हजार मतांचा टप्पा पार केला. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या दुपारी 4:15 च्या सुमारास थेरगाव येथील मतमोजणी केंद्राजवळ पोहोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. हलगीचा खणखणाट आणि फटाक्यांच्या आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मतमोजणीचा अंतिम निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्कंठा ताणली गेली होती. मतमोजणी केंद्राबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांची झालेली गर्दी पाहता त्यांना या बॅरिकेट्स बाहेरच पोलिसांनी थांबवून ठेवले होते. आता कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या अंतिम निकालाचीच प्रतीक्षा आहे.

Back to top button