कसबा पेठेत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू : बावनकुळे | पुढारी

कसबा पेठेत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू : बावनकुळे

पुढारी ऑनलाईन: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पस्तीस वर्षानंतर परिवर्तन झाले आहे.भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी विजय मिळवत हेमंत रासने यांचा पराभव केला. या पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कसब्याच्या जागेवर आम्ही का पराभूत झालो? याबाबत आम्ही आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. चिंचवडची निवडणूक आम्ही जिंकलो. मात्र,कसब्यात आमचा पराभव झाला. सध्या राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे तेथील विकास आम्ही करणार आहे करु, असेही बावनकुळे म्हणाले.

कसबा पेठ निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपाचे बावनकुळे यांनी खंडण केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणुकीच्या आधी व्हिडिओ दाखवायला पाहिजे होते. ते व्हिडिओ निवडणुकी नंतर दाखविण्याचे कारण काय? हे मला समजले नाही. मुळात आमची परंपरा ही पैसा वाटून मत मागायची नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे केवळ महाविकास आघाडीचे काम असल्याची टीका बावनकुळे यांनी यावेळी केली.

राहुल कलाटेंमुळे खरंच मविआचा पराभव झाला?

अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी फक्त नाना काटेंचीच नाही, तर भाजपचीही मतं घेतली. ते सांगतात ते चुकीचं आहे. आयटी पार्कमधली सर्व मतं कलाटेंनी घेतली आहेत. त्यामुळे पूर्णपणे असं म्हणता येत नाही की, राहुल कलाटेंना पडलेली मतं फक्त त्यांचीच आहेत. त्याने काही फरक पडत नाही. पण तिथे त्यांचा पराभव झालाय हे त्यांनी मान्य केलं पाहिजे, असं देखील बावनकुळे म्हणाले.

Back to top button