पुणे : धंगेकरांच्या विजयाचा मध्यवस्तीत जल्लोष आणि गुलालाची उधळण | पुढारी

पुणे : धंगेकरांच्या विजयाचा मध्यवस्तीत जल्लोष आणि गुलालाची उधळण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रविंद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर मध्यवस्तीत ठीकठिकाणी जल्लोष करण्यात आले. नवी पेठ, नारायण पेठ, रविवार पेठेसह नारायण पेठेमध्ये सुद्धा जल्लोष करण्यात आला. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून डीजे लावून फुलांची उधळण करून आणि फटाके फोडून धंगेकर यांच्या विजय उत्सवात सहभाग सहभाग घेतला, आणि जल्लोष केला.

विजयानंतर काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश काकडे, बोरवेलचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे दीपक मानकर, काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर, शिवसेनेचे निरंजन दाभेकर यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

Back to top button