पुणे : रवींद्र धंगेकर यांच्या विजयात 'या' गोष्टीचा सर्वात मोठा वाटा | पुढारी

पुणे : रवींद्र धंगेकर यांच्या विजयात 'या' गोष्टीचा सर्वात मोठा वाटा

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी झाले असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केले आहे. धंगेकर यांचा हा विजय महाराष्ट्रात नव्हे तर परराज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आहेत.

महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण असले, तरी दुसरेही एक रंगतदार कारण धंगेकर यांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले आहे, असे लोक सांगतात, रवींद्र धंगेकर म्हणजे एक सामान्य नागरिक, हाक मारताच अक्टिवा घेऊन मदतीला येणारा कार्यकर्ता. त्यांना ही ओळख त्यांच्या अक्टिवा गाडीने मिळवून दिली. त्यामुळे त्यांच्या विजयात ह्या अक्टिवा गाडीचाही मोठा वाटा असल्याचं बोलल जात आहे

रवींद्र धंगेकर हे नेहमी अनेकांना अक्टिवा गाडीवर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा त्यांचा रोजचा प्रवास. या अक्टिवावरच ते अनेकांच्या गाठी – भेटी घेतात मतदारांशी संपर्क ठेवतात. साधा कार्यकर्ता आणि सामान्य माणूस म्हणून त्यांना या अक्टिवामुळे ओळख मिळाली आहे. ही ओळखच या निवडणुकीत त्यांची विजयाची बाजू ठरत आहे. अनेकांनी आजच्या विजयानंतर त्यांच्या गाडीसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Back to top button