निकालानंतर माझी परिस्थिती थोडी खुशी, थोडी गम : अजित पवार | पुढारी

निकालानंतर माझी परिस्थिती थोडी खुशी, थोडी गम : अजित पवार

पुढारी डिजिटल : सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल समोर येतो आहे. चिंचवडचा निकाल स्पष्ट झाला नसला तरी कसब्यात मात्र जनतेने कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला आहे. यादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार याची प्रतिक्रिया समोर येताना दिसते आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणतात, ‘ या निकालाबाबत माझी परिस्थिती थोडी खुशी, थोडी गम अशी झाली आहे.

उमेदवार म्हणून धंगेकर यांची निवड योग्य ठरली. धंगेकर हा तळागाळात काम करणारा नेता आहे. महाविकास आघाडीने कसब्यात एकत्र काम केल्याने विजय झाला आहे. तेच चिंचवडबाबत बोलायचं तर राहुल कलाटेची समजूत घालण्यासाठी खूप प्रयत्न केले. नाना काटे आणि राहुल कलाटे यांची एकत्रित मतं पाहता भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे इथे या दोघांऐवजी एक उमेदवार असता तर आम्हाला नक्कीच यश मिळालंअसतं.

Back to top button