कसब्यातील विजयानंतर आदित्य ठाकरे यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…. | पुढारी

कसब्यातील विजयानंतर आदित्य ठाकरे यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले....

पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांनी विजयी मिळवला. धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी रविंद्र धंगेकरांचं अभिनंदन केलंय. तर, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही धंगेकर हा जमिनीवर राहून काम करणारा नेता आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा कार्यकर्ता आह. तसेच उमेदवाराची योग्य निवड केल्यानेच हा महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, कसबा पेठ मतसंघातील महाविकास आघाडीच्या विजयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांच्यासाठी कसबा पेठ मतदारसंघात रोड शो घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. कसबा पेठ विजयाचं वातावरण हे महाराष्ट्रात आणि देशात कायम राहील, असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. या मतमोजणीत रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला होता.

Back to top button