

पुढारी डिजिटल : बाराव्या आणि तेराव्या फेरीतील काट्याच्या चुरशीनंतर चिंचवड पोटनिवडणुकीत चौदाव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. बाराव्या फेरीत अश्विनी यांना 48,369 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 40042 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 14117 मतं मिळाली आहेत. एकूण बाराव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 8,327 मतांची आघाडी घेतली आहे.
फेरी क्रमांक 14
1) अश्विनी जगताप- 48,369
2) नाना काटे- 40042
3) राहुल कलाटे- 14117