कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात | पुढारी

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी सुरू होईल, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघात पहिल्या फेरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

तर दुसऱ्या फेरी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे त्यांची आघाडी तोडून पुढे जातात की काय हे पहावे लागेल, मतमोजणी पहिली फेरी ही 14 केंद्राची असून त्यामध्ये मुख्यत्वे कागदी पुरा कसबा पेठ येथील मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर शनिवार पेठ तसेच रमण बाग नूमवी शाळा येथील मतांची मोजणी होणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे

Back to top button